आजची वात्रटिका
----------------------------
जाग उठा पदवीधर!
जागे झाले पदवीधर,
उमेदवारही जागे झाले आहेत.
कोण माजी ? कोण आजी ?
हेही लक्षात आले आहेत.
जसे कुणी आमदार आहेत,
तसे कुणी नामदार आहेत,
दमदार अनेक असले तरी,
फार कमी कामदार आहेत.
ज्याला जमते पटवापटवी,
त्यालाच लोकशाही पावली जाते!
पदवीधरच्या मार्गाने,
आणखी एकाची सोय लावली जाते!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9413
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
30 सप्टेंबर 2026

No comments:
Post a Comment