Tuesday, May 31, 2022

महिला मुख्यमंत्री !..... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
महिला मुख्यमंत्री !
कुणी म्हणतो,ताई पाहिजे,
कुणी म्हणतो,आई पाहिजे.
वहिनी असोत वा बहिणी,
मुख्यमंत्रीपदी बाई पाहिजे.
विचार जेवढा पुरोगामी,
तेढाच विचार योग्य आहे !
मात्र ठराविक घराण्यांकडेच,
मुख्यमंत्रीपदाचे सौभाग्य आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7944
दैनिक झुंजार नेता
31मे2022

 

राज्यसभेचा कोटा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

राज्यसभेचा कोटा

कुणाला सडवले जाते,
कुणाला कुठूनाही लढवले जाते.
व्यक्ती आणि पक्षापेक्षा देश मोठा,
असे सोयिस्कर पढवले जाते.

खरे तर ही बढाई असते,
गुप्त तहानंतर खुली लढाई असते !
जे असतात बळीच्या बकरे
त्यांचीच एकमेकांवर चढाई असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6490
दैनिक पुण्यनगरी
31मे2022

 

Monday, May 30, 2022

बाजार बसवे... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

बाजार बसवे

हेही फसवे आहेत,
तेही फसवे आहेत.
एकमेकांवर आरोप,
बाजार बसवे आहेत.

घोड्यांच्या खुराकासाठी,
बाजार मांडला जातो.
बाजार बसव्यांकडून,
प्रत्येकजण गंडला जातो.

गंडवा - गंडवी आहे,
तंडवा - तंडवी आहे !
आत्माभिमानाच्या गजरात,
बंडवा - बंडवी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6489
दैनिक पुण्यनगरी
30मे2022

 

तंबाखूचा विडा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

तंबाखूचा विडा

इकडे आहे,तिकडे आहे
प्रत्येक गल्लो गल्ली आहे.
पिचकाऱ्या बार उडवतात,
इथेही रामाची वल्ली आहे.

आयुष्याला चुना लावण्याचा,
जणू तंबाखूचा विडा आहे !
त्यांना सावधानतेचा इशारा,
ज्यांना तंबाखूचा किडा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-7943
दैनिक झुंजार नेता
30मे2022

 

Sunday, May 29, 2022

मान्सूनचा स्वभाव.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

मान्सूनचा स्वभाव

कधी वाटतो खेडवळ आहे,
कधी वाटतो तो शहरी आहे.
मान्सून शिक्कामोर्तब करतो,
मी तर पक्का लहरी आहे.

अंगात वारे शिरले की,
तो अंदाजावर पाणी फिरवतो,
लुंग्या- सुंग्या बरोबरच,
मान्सून वेधशाळेचीही जिरवतो.

आपला लोकांना अंदाज येतो,
याचाच मान्सूनला जणू राग आहे !
तो कितीही लहरी असला तरी,
त्याला येणे मात्र भाग आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6488
दैनिक पुण्यनगरी
29मे2022

 

हास्यनामा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
हास्यनामा
काही काही लोकांचे बघा,
नेमके काय अन् कसे होते?
आपल्याच हातांनी,
नेमके आपलेच हसे होते.
आपलेच हात,आपलेच हसे,
अशी त्यांची गत असते !
हसतील त्यांचे दात दिसतील,
ही म्हण त्यांच्यापुढे मृत असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7942
दैनिक झुंजार नेता
29मे2022

Saturday, May 28, 2022

घोडे बाजार... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

घोडे बाजार

फूरफुरू लागले घोडे,
त्यांना बाजाराचा वास आला.
घोडे म्हणाले घोड्यांना,
आपला बाजार सुरू झाला.

आपला मांडतात बाजार,
त्यांना मोकळे कुरण असते !
जे लावतात जादा बोली,
त्यांना लोकशाही शरण असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7942
दैनिक झुंजार नेता
28मे2022

 

व्हेज -नॉनव्हेज ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

व्हेज -नॉनव्हेज

तुमच्या सहिष्णू वृत्तीला,
ही बाब धक्के देवू शकते.
अस्तिक आणि नास्तिकतेचेही,
राजकीय भांडवल होऊ शकते.

राजकीय भांडवलशाहीचा,
कुणालाही कसलाच शोक नाही !
फक्त हसू नका,चिंतन करा,
हा काही नॉनव्हेज जोक नाही!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6487
दैनिक पुण्यनगरी
28मे2022

 

Friday, May 27, 2022

जिभाळ्या ...आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

जिभाळ्या

आज्या या, उद्या त्याच्या,
जीभेला जिभाळी लागते आहे.
लवलवती जीभ मग,
आणखीनच बेताल वागते आहे.

त्यांचे त्यांनाच कळत नाही,
बोलताना काहीही घुसडू नये !
जशातसे उत्तर म्हणून,
कुणी काहीही हासडू नये !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7941
दैनिक झुंजार नेता
27मे2022

 

दैनिक वात्रटिका26एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 26एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -324वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1N42gbSXBLD3hpxa6K1aUN...