Wednesday, May 25, 2022

लोकशाहीचा कंड... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

लोकशाहीचा कंड

लोकशाहीत राजेशाही,
वारसा हक्काने घुसू लागली.
घराणेशाही लोकशाहीला,
आता खुदुखुदू हसू लागली.

राजेशाहीचे लोकशाही विरुद्ध,
अगदी उडता बसता बंड आहे !!
घराणेशाही आणि राजेशाहीचा,
तरीही लोकशाहीला कंड आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6484
दैनिक पुण्यनगरी
25मे2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...