आजची वात्रटिका
------------------------
मु.पो.सोशल मीडिया
पाळीव आणि घोळीव,
कुत्रे भोकातात इथे.
आपल्याच भिंतीवर,
रोज गरळ ओकतात इथे.
बाईला गड्याचा चेहरा,
गड्याला बाईचा चेहरा इथे.
आडात काही नसले तरी,
आदळती आपला पोहरा इथे.
झेलकरी आणि ट्रोलकरी,
जरी राबतात रात्रंदिन इथे !
तरी मुंह छुपा के जिओ,
हाच अजेंडा कॉमन इथे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6477
दैनिक पुण्यनगरी
17मे2022

No comments:
Post a Comment