Monday, May 16, 2022

महागाईची 'शहा' निशा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

महागाईची 'शहा' निशा

तुम्ही महागाई चुकीची मोजता,
तुमचे चुकीचे मीटर आहे.
तुमचे पाणी किती स्वस्त?
त्यांचे साडेआठशे रुपये लिटर आहे.

तुम्हाला कसलेच वलय नसेल,
त्यांचे बघा वलय केवढे आहे?
तुमचे दुःख फक्त जवाएवढे,
सांगता हिमालयाएवढे आहे.

महागाईची ' शहा ' निशा करा,
कळेल हेही दिन अच्छे आहेत!
महागाई सोसा,देशभक्त दिसा,
हे दिलासे खोटे आणि लूच्चे आहेत!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6476
दैनिक पुण्यनगरी
16मे2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 244वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 244वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1pdEGCxoCqmh185jRv5...