आजची वात्रटिका
-------------------------
काला धंदा गोरे लोग
काला धंदा गोरे लोग,
सिनेमा नेहमीच हिट आहे.
आमच्यासकट सर्वांना,
याचाच तर विट आहे.
आपल्या आसपासही,
त्यांचीच तर भरती आहे !
त्यांचे होते गुणगान,
त्यांचीच तर आरती आहे.
गुणगान आणि आरत्यामुळे,
तिकडेच सगळी भरती आहे !
गोऱ्या लोकांनांसुद्धा,
काळया धंद्याची स्फूर्ती आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7935
दैनिक झुंजार नेता
21मे2022
No comments:
Post a Comment