आजची वात्रटिका
-------------------------
सोशल टॉनिक
सोशल मीडियावर सगळे,
जणू ऑल दी बेस्ट आहे.
कसल्या कसल्या फोटोंची,
पोस्ट मागे पोस्ट आहे.
आजकाल प्रत्येक गोष्ट,
निव्वळ फोटोजेनिक आहे !
लाईक आणि शेअर,
आज हेच जणू टॉनिक आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7937
दैनिक झुंजार नेता
23मे2022
No comments:
Post a Comment