Monday, May 16, 2022

आंधळी कोशिंबीर...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

आंधळी कोशिंबीर

मी ओळखले घाव त्यांचे,
मी ओळखले गाव त्यांचे.
तुम्हासही जे माहित आहे,
सांगू कशाला नाव त्यांचे?

सारे काही ओळखूनही,
कुणीच ओळख दाखवत नाही.
कुणी केलेच धाडस तर,
कुणासही ते देखवत नाही.

आंधळ्या कोशिंबिरीची,
ही सगळी धप्पा धप्पी आहे!
आहे तसेच चालू राहील,
जोपर्यंत तुमची चुप्पी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7930
दैनिक झुंजार नेता
16मे2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 244वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 244वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1pdEGCxoCqmh185jRv5...