Tuesday, May 10, 2022

मुख्यमंत्र्यांची जातवारी.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

मुख्यमंत्र्यांची जातवारी

या जातीचा मुख्यमंत्री बघायचा आहे,
त्या जातीचा मुख्यमंत्री बघायचा आहे.
आपले विधान खरे ठरले तर,
त्यांना जातीय आनंद भोगायचा आहे.

या जातीचा व्हावा,त्या जातीचा व्हावा,
पण त्यात जातीभेद नसला पाहिजे !
जातीपातीचे नंतर बघुयात,
प्रथम तो महाराष्ट्राचा असला पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7924
दैनिक झुंजार नेता
10मे2022

 

No comments:

युद्ध प्रसंग....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- युद्ध प्रसंग पेट्रोल पंपा पंपावरची अवस्था, इंधन भरू किंवा मरू आहे. इंधन टंचाईमुळे खात्री झाली, आखा...