Sunday, May 15, 2022

महागाईची कथा...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

महागाईची कथा

जास्तच किंमत मोजावी लागते,
जेवढी वस्तूच्या खोक्यावर आहे.
वाढत्या महागाईचे खापर,
परस्परांच्या डोक्यावर आहे .

महागाईचा कोरस आहे ,
ढकलाढकलीची चुरस आहे!
कमी होत नाही,कमी झाली नाही,
महागाईची कथा निरस आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6475
दैनिक पुण्यनगरी
15मे2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...