Wednesday, May 25, 2022

योगायोग.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

योगायोग

दरवर्षीचा मे महिना,
लग्नाच्या वाढदिवसाचा असतो.
लाखात एक असते बायको,
प्रत्येक नवरा नवसाचा असतो.

कुणाची पूर्ण होतात स्वप्नं,
कुणाचा आनंद गुल अससतो !
तरीही पुढचा जून महिना
वाढदिसांनी हाऊस फुल असतो !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7939
दैनिक झुंजार नेता
25मे2022

 

No comments:

daily vatratika...7march2025