आजची वात्रटिका
-------------------------
विष पेरणी
काय उगवून आणायचे आहे,
त्यानुसारच पेरणी केली जाते.
सर्वत्र द्वेष पसरला पाहिजे,
अशीच करणी केली जाते.
पेरणीला आणि करणीला,
निव्वळ योगायोग ठरवले जाते!
अफवा नावाच्या बातम्यांना,
वाऱ्याबरोबर फिरवले जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7940
दैनिक झुंजार नेता
26मे2022
No comments:
Post a Comment