आजची वात्रटिका
-------------------------
चुम्मा आणि जुम्मा
काल जे एकत्र होते,
आज तेच समांतर झाले.
एका नंतर एक असे,
सरकारचे नामांतर केले.
काल चुम्मे एके चुम्मे होते,
आज जुम्मे एके जुम्मे आहे.
त्यांचे पुण्य निम्मे असेल तर,
त्यांचे पापही निम्मे आहे.
आघाडी,तिघाडी, बिघाडी
असा चौका आणि छक्का आहे!
अमर,अकबर आणि अँथनी,
असा सरकारवर शिक्का आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6483
दैनिक पुण्यनगरी
24मे2022
No comments:
Post a Comment