आजची वात्रटिका
------------------------
भाववाढीचा पिच्छा
वाजवायचे तेवढे भोंगे वाजवा,
गॅस सिलेंडर धगधगतो आहे.
भाववाढीच्या वाढत्या ज्वालांकडे,
जो तो आ वासून बघतो आहे.
अन्न गोड लागूच द्यायचे नाही,
अशीच जणू सरकारची इच्छा आहे !
पेट्रोल, डिझेल आणि गॅसकडून,
सामान्य माणसाचा पिच्छा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6469
दैनिक पुण्यनगरी
8मे2022
No comments:
Post a Comment