Wednesday, May 11, 2022

राजकीय चूल... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

राजकीय चूल

कुकरची शिट्टी झाली नाही तर,
राजकीय वाफ कोंडली जाते.
आपली डाळ शिजण्यासाठी,
नवी राजकीय चूल मांडली जाते.

नवी राजकीय चूल मांडली तरी,
त्यात जुनेच सरपण घातले जाते !
फुंकून फुंकूंन बेजार होतात,
तेंव्हा कुठे राजकारण चेतले जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7925
दैनिक झुंजार नेता
11मे2022

 

No comments:

भविष्यवाणी ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका --------------------- भविष्यवाणी अजूनही या प्रश्नांची उत्तरे, कुणालाच मिळाले नाहीत. जगाचे भविष्य सांगणाऱ्यांना, स्वतःचे मृत्...