Sunday, May 8, 2022

रूपांतर.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
रूपांतर
खरे खोटे वाटू लागले,
खोटे खरे वाटू लागले आहे
एकमेकांचे रूप घेवून,
खरे खोटे भेटू लागले आहे.
खऱ्याच्या खोट्याच्या तोंडावर,
परस्परांचा बुरखा आहे.
खऱ्यासह खोटेही बिनधास्त,
आपलाच सूर चिरका आहे.
ती म्हण कालबाह्य झाली,
खोट्याच्या पदरी गोटा आहे !
सोशल मीडियाच्या सौजन्याने,
खऱ्याच्या माथी सोटा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7922
दैनिक झुंजार नेता
8मे2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 244वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 244वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1pdEGCxoCqmh185jRv5...