Wednesday, May 18, 2022

धर्मांधांची दृष्टी... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

धर्मांधांची दृष्टी

कुणी अफवा सोडतो आहे,
कुणी कळ काढतो आहे.
तुमच्यापेक्षा आमचा श्रेष्ठ,
धार्मिक उन्माद वाढतो आहे.

वाढत्या धार्मिक उन्मादामुळे,
धार्मिकता खोटी भासू लागते !
धर्मांध धर्मांध असले तरी,
त्यांना नको ते दिसू लागते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7932
दैनिक झुंजार नेता
18मे2022

 

No comments:

उदात्तीकरणाचे प्रयोग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- उदात्तीकरणाचे प्रयोग अनिष्ट आणि घातक परंपरांचे, एक मात्र खूप छान असते. अनिष्ट आणि घातक परंपरांना, ...