Sunday, May 22, 2022

इंधन स्वस्ताई... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
इंधन स्वस्ताई
इंधन स्वस्ताई झाल्याचे,
मनापासून भावले आहे.
आधी हातभर फाडून,
नंतर टिचभर शिवले आहे.
महागाई आणि स्वस्ताई,
यांचा शिवाशिवीचा खेळ आहे.
इंधन दरवाढ म्हणजे,
महागाईला लावलेली कळ आहे.
आधी महागाई वाढवून
नंतर स्वताईचे नाटक नको !
फाडाफाडी आणि शिवाशिवी,
यांची फसवी चटक नको !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6481
दैनिक पुण्यनगरी
22मे2022

 


No comments:

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 244वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 244वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1pdEGCxoCqmh185jRv5...