आजची वात्रटिका
------------------------
मंथन
रवीने घुसळताच,
नवनीत निघू लागले
देशद्रोहाचे इंग्रजी कलम,
आ वासून बघू लागले.
सत्तेचा सत्तेविरूद्ध,
कायदेशीर दंगा आहे.
सहकुटुंब सहपरिवार,
एकमेकांशी पंगा आहे.
अति झाले,हसू आले,
स्वातंत्र्यपूर्व स्थिती नाही !
देशद्रोहाच्या गुन्ह्याची,
सध्या तरी भीती नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6472
दैनिक पुण्यनगरी
12मे2022
No comments:
Post a Comment