आजची वात्रटिका
------------------------
जुगलबंदी
कुणाच्या डरकाळ्या आहेत,
कुणाच्या टिरकाळ्या उडत आहेत.
दोघांच्याही जुगलबंदीला,
लोकांच्या टाळ्या पडत आहेत.
आपल्याच प्रतिमेचे,
आपल्याकडून भंजन होते आहे!
मूलभूत मुद्दे बाजूला राहिले तरी
लोकांचे मनोरंजन होते आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7923
दैनिक झुंजार नेता
9मे2022
No comments:
Post a Comment