आजची वात्रटिका
------------------------
भ्रष्टावतार
भ्रष्टाचाराच्या समानतेला,
कधी आणि कुठेही छेद नाही.
स्त्री असो वा पुरुष ,
त्यात अधला मधला भेद नाही.
जात,धर्म,प्रांत,भाषा,
भ्रष्टाचार काही पाळीत नाही.
कसेही देवो,कुणीही देवो,
देणे घेणे काही टाळीत नाही.
भ्रष्टाचार तिथे बोकाळतो,
जिथे जिथे टेबल आहे !
भ्रष्टाचार जसा लोकल आहे,
तसाच तो ग्लोबल आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6472
दैनिक पुण्यनगरी
11मे2022
No comments:
Post a Comment