आजची वात्रटिका
------------------------
चाल - ढकल
अनेक वर्षांचे प्रश्न,
नेत्याने सोडवले होते.
श्रेय लाटण्याचेही,
धडाके उडवले होते.
उधळला गुलाल,
धडालेल्या तोफा होत्या.
कार्यकर्त्यांची कुजबूज,
ह्या तोंडाच्या वाफा होत्या.
लोकांचे खुलले चेहरे,
कार्यकर्ते भांबवले होते !
सर्व प्रलंबित प्रश्न,
नेत्यानेच लांबवले होते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
दैनिक वात्रटिका
13मे2022
No comments:
Post a Comment