आजची वात्रटिका
------------------------
राजकीय वैर
वरून वरूनच वेगळे दिसले तरी,
आतून मात्र सगळे एक असतात.
त्यांच्या राजकीय वैराच्या,
बातम्या निव्वळ फेक असतात.
कोळसा काळा असूनही,
आपण पुन्हा उगळत असतो !
तरीही त्यांच्या वैराच्या कथा,
आपण चवीने चघळत असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7933
दैनिक झुंजार नेता
19मे2022
No comments:
Post a Comment