आजची वात्रटिका
-------------------------
बेहिशोबी संपत्ती
आमच्या समोर जरा वेगळीच,
पण मोठी समस्या उभी आहे.
आमची सगळीच संपत्ती,
खरोखरच बेहिशोबी आहे.
संपत्ती बेहिशोबी असण्याचे,
एक आणि एकच कारण नाही.
त्याचा हिशोब कशाला करायचा?
अजून तरी सत्याला मरण नाही.
जो हिशोबच करीत नाही,
तोच जगात सर्वात सुखी आहे!
हिशोबच करायचा झाला तर,
आमची सगळीच वजाबाकी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6486
दैनिक पुण्यनगरी
27मे2022
No comments:
Post a Comment