Sunday, May 15, 2022

सूर्य म्हणे ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

सूर्य म्हणे ...

भाडोत्री प्रतिभा,भाडोत्री निंदा l
भाडोत्री धंदा,बरा नाही ll1ll

भाडोत्री जगाचे,भाडोत्री तंतर l
छू....मंतर, कुत्र्यांसाठी ll2ll

नागिण सळसळे,केतकीच्या बनी l
कुणाच्या मनी,भावे काय? ll 3ll

निंदा किंवा वंदा,चालू त्यांचा धंदा l
नको अंगावरी रेंदा, सूर्य म्हणे ll4ll

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7928
दैनिक झुंजार नेता
15मे2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 244वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 244वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1pdEGCxoCqmh185jRv5...