Saturday, May 14, 2022

जनहित याचिका.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

जनहित याचिका

आजकाल उथळ पाण्याला,
जरा जास्तच खळखळाट आहे.
जनहित याचिकांचा,
जरा जास्तच सुळसुळाट आहे.

जसा कानून अंधा आहे,
तसा तो कुणाचा तरी धंदा आहे.
जनहित याचिकांचा,
कोर्टाच्या गळ्यात फंदा आहे.

अन्याय अन्या म्हणीत,
कोर्टाच्या माथी खापर आहे !
अन्यायासाठी न्यायाचा,
अगदी हक्काने वापर आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6474
दैनिक पुण्यनगरी
14मे2022

No comments:

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 244वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 244वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1pdEGCxoCqmh185jRv5...