आजची वात्रटिका
------------------------
निवडणुकांचे वेध
पावसाचा अंदाज घेवून,
तुम्ही निवडणुका घेऊ शकता.
कोर्टाने आदेश दिला तरी,
वेधशाळेवर विश्वास ठेवू शकता?
कोर्टाचा सुप्रीम आदेश म्हणजे,
गोष्ट फक्त योगायोगाची नाही !
खरी परीक्षा वेधशाळेची आहे,
निवडणूक आयोगाची नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6477
दैनिक पुण्यनगरी
18मे2022
No comments:
Post a Comment