Sunday, October 31, 2021

राजेहो....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

राजेहो....

जेंव्हा व्यवहार घाट्यात जातो,
तेंव्हा बघा तोटे कोणते होतात?
तेंव्हा राजेहो,लक्षात ठेवा;
जुने जाणतेसुद्धा नेणते होतात.

एरव्ही ज्यांना जाणते म्हणतो,
त्यांचे तोंडावरती बोट असते !
अळीमिळी गुपचिळी,
इथेच तर खरी खोट असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7747
दैनिक झुंजार नेता
31ऑक्टोबर 2021

 

समर्थनाचा तमाशा...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

समर्थनाचा तमाशा

नेता असो वा अभिनेता,
त्यांचे आंधळे सार्थन केले जाते.
बापासोबत लेकरांच्याही,
अवती भोवती नर्तन केले जाते.

आंधळे समर्थन म्हणजे,
समर्थकांचा नंगानाच असतो !
नेते असोत वा अभिनेते,
सर्व तमाशा सारखाच असतो!!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6309
दैनिक पुण्यनगरी
31ऑक्टोबर 2021

 

Saturday, October 30, 2021

भंगारवाला....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

भंगारवाला

गांजाफुके आणि फरारी,
यांचीच आज आरती आहे.
होय मी भंगारवाला म्हणीत,
भंगारवाल्यांची भरती आहे.

त्यांची जुगलबंदी बघून,
आपण जागेपणी दचकू शकतो!
भंगारवाल्याशिवाय दुसरा कोण?
कुणाचे उकांडे उचकू शकतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
फेरफटका-7746
दैनिक झुंजार नेता
30ऑक्टोबर 2021

 

कोरोनाची उपरती...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------------

कोरोनाची उपरती

जसा आपण लोकांचा अंत पाहिला,
तसे लोक आपला अंत पाहू लागले.
आपण लोकांना श्रद्धांजल्या वाहिल्या,
आता लोक आपल्याला वाहू लागले.

आपण उडवली दाणादाण,
पण लोकांनी त्याचे वरदान केले!
पॉझिटिव्ह विचाराला गती दिली,
हे निगेटिव्हमधूनही छान केले !


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7745
दैनिक झुंजार नेता
29ऑक्टोबर 2021
 

फेसबुकचे नामांतर ...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

फेसबुकचे नामांतर

आपल्या जुन्या ब्रँडला,
अखेर फेसबुकने टाटा केले.
आपले नामांतर करून,
आपले नाव 'मेटा' केले.

आपल्या व्हेज पेज वरती,
नॉन व्हेजचाच रेटा आहे !
नामांतराने सिद्ध झाले,
फेसबुकचा चेहेरा खोटा आहे !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6308
दैनिक पुण्यनगरी
30ऑक्टोबर 2021

 

खान-दान की इज्जत... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------------


खान-दान की इज्जत

जावयामागे सासरा आहे,
जावयाविरुद्धही सासरा आहे.
दोन बायका फजिती ऐका,
वर जाती-धर्माचा आसरा आहे.

सासरा कसा असावा? 
सासरा कसा नसावा?
जणू याचीच ही झाँकी आहे !
खान-दानकी इज्जत खततरेमें,
तरी अजून पिक्चर बाकी आहे !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6307
दैनिक पुण्यनगरी
29ऑक्टोबर 2021

घाबर-गुंडी...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------------

घाबर-गुंडी

लोकांना घाबरून सोडण्यात,
आरोग्य संघटनेचा हात आहे.
कोरोनाच्या साथी नंतर,
नवीन भयंकर साथ आहे.


ही पूर्वसूचना म्हणावी?
ही पुन्हा नवी कंडी आहे !
पॉझिटिव्ह विचार करताना,
सोबतच घाबर-गुंडी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7604
दैनिक झुंजार नेता
27मे2021

 

नाटकाचा तमाशा.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका 
--------------------------------

नाटकाचा तमाशा

एक होता जाड्या,
एक होता रड्या.
दोघांच्या नेहमी,
चालायच्या खोड्या.

रड्या नेहमी रडायचा,
जाड्या मध्ये पडायचा!
त्यांच्या नाटकाचा,
नेहमी तमाशा घडायचा!!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7601
दैनिक झुंजार नेता
26मे2021

 

गाजा- वाजा.. मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------------

गाजा- वाजा


कुणी कुणाची गाजवू लागले,
कुणी कुणा ची वाजवू लागले.
कुणी कुणासाठी तोंडाबरोबर,
आपल्या लेखण्या झिजवू लागले.


सत्त्याची पाठराखण व्हावी,
पण खोट्याचा गाजावाजा नको!
दगडाला देव बनवून,
त्याची भाडोत्री पूजा नको !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7602
दैनिक झुंजार नेता
25मे2021
 

कल्पना... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------------

कल्पना


मागितलेल्या मताला,
आता प्रत्येकाने जागले पाहिजे.
गावोगावी प्रत्येक पक्षाचे,
कोविड सेंटर लागले पाहिजे.

सामाजिक बांधिलकी,
यामुळे तरी कळून येईल!
पसरणारा कोरोना,
धूम ठोकून पळून जाईल !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7599
दैनिक झुंजार नेता
24मे2021

 

योगा - योग...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------------

योगा - योग

कोरोनामुळे वैद्यकीय क्षेत्राची,
नको तेवढी शोभा आहे.
त्यात सोबतीला पुन्हा,
योगायोगाने रामदेव बाबा आहे.

पॅथी विरुद्ध पॅथी,
विज्ञानाची माती आहे!
आजीबाईचा बटवा,
आजीबाईच्या हाती आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7598
दैनिक झुंजार नेता
23मे2021
-------------------

 

Friday, October 29, 2021

मदतीचे राजकारण... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------------

मदतीचे राजकारण

मानवता म्हणून मदत नक्की करा,
मदतीचे राजकारण करू नका .
मदतीच्या करंजीच्या आत,
राजकीय सारण भरू नका.

मदत आणि कर्तृत्वाला,
पाहिजे तेवढी संधी आहे !
जिथे चालली राजकीय चढाओढ,
ती मात्र राजकीय अंदाधुंदी आहे!!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7598
दैनिक झुंजार नेता
22मे2021

 

सार्वकलिक सत्य... मराठी वात्रटिका

---------------------------

सार्वकलिक सत्य

जसा सुखातही भ्रष्टाचार होतो,
तसा दुःखातही भ्रष्टाचार होतो.
असे मुळीच नाही की,
कधी कमी, कधी फार होतो.

याचा अर्थ असा की,
भ्रष्टाचार सार्वकालिक सत्य आहे!
भ्रष्टाचाऱ्यात भ्रष्टाचार,
सदा सर्वदा स्तुत्य आहे !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7598
दैनिक झुंजार नेता
21मे2021
-------------------
 

कोरोनाचा काळाबाजार.. मराठी वात्रटिका

--------------------------------

कोरोनाचा काळाबाजार

इकडे कोरोनामुळे,
प्रत्येक जण बेजार आहे.
तिकडे मात्र कोणाच्या नावावर,
चक्क काळाबाजार आहे.

कोरोना हा असा,
एकच आजार आहे!
ज्याच्या प्रत्येक गोष्टीत,
मोठा काळाबाजार आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7597
दैनिक झुंजार नेता
20मे2021
-------------------

 

ऐतिहासिक विकृती...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- ऐतिहासिक विकृती एकीकडे खोट्या इतिहासाशी, खऱ्या इतिहासाचे लढणे चालू आहे. दुसरीकडे विकृत इतिहासाच्या, व...