Saturday, October 9, 2021

पुरुषी विचार..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
पुरुषी विचार
बायकांचे असते नवरात्री,
आपली गटारी आणि होळी आहे.
चिअर्स आणि शेअर्स म्हणीत,
टाळीवरती जोरात टाळी आहे.
बायकांचे रंगते हळदीकुंकू,
आपला पेग आणि चकणा असतो!
नवरात्रीच्या नऊ दिवसांचा,
एका गटारीपुढे बुकणा असतो !!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6286
दैनिक पुण्यनगरी
9ऑक्टोबर 2021

 

No comments:

दुष्काळी पाहुणचार ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- दुष्काळी पाहुणचार दुष्काळ पाहणी दौरा बघून, आमचे मतही ठाम झाले. एकाचा पाहुणचार करताना, दुसरेच हकन...