Tuesday, October 19, 2021

अनुभवाचे बोल !....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

अनुभवाचे बोल !

एकमेकांचे पतंग काटताना,
मांजामध्ये मांजा अडकला आहे.
सगळी ओढा-ओढी चालल्याने,
महाराष्ट्रात गांजा भडकला आहे.

चढलेली नशा अन,
ढासळत चाललेले तोल आहेत!
ही चहाडीअगर चुगली नाही,
हे तर अनुभवलेले बोल आहेत !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6296
दैनिक पुण्यनगरी
19ऑक्टोबर 2021

 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...