Friday, October 22, 2021

नाते आणि गोते...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

नाते आणि गोते

एका ड्रग्स पार्टीमुळे,
केवढा तमाशा झाला आहे.
कुणाचा लेक निष्पाप तर,
कुणाचा जावई भला आहे.

आई-बापांचे उद्धार झाले,
कुणाची लेकही लाडकी आहे!
सगळ्याच नात्या-गोत्यांची,
पार्टीत अडका-अडकी आहे !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6299
दैनिक पुण्यनगरी
22ऑक्टोबर 2021

 

No comments:

ऐतिहासिक विकृती...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- ऐतिहासिक विकृती एकीकडे खोट्या इतिहासाशी, खऱ्या इतिहासाचे लढणे चालू आहे. दुसरीकडे विकृत इतिहासाच्या, व...