Tuesday, October 12, 2021

बंद एक छंद...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

बंद एक छंद

कधी त्यांचा छंद असतो,
कधी यांचा छंद असतो.
राजकीय चालुपणासाठी,
ज्यांचा त्यांचा बंद असतो.

जसे ते छंदिष्ट आहेत,
तसेच ते बंदिष्ट आहेत !
निष्ठादर्शना करण्यापुरतेच
सगळे लोकनिष्ठ आहेत !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6289
दैनिक पुण्यनगरी
12ऑक्टोबर 2021
 

1 comment:

KABADE VISHWESHWAR said...

लय भारी सर!👌👍

ऐतिहासिक विकृती...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- ऐतिहासिक विकृती एकीकडे खोट्या इतिहासाशी, खऱ्या इतिहासाचे लढणे चालू आहे. दुसरीकडे विकृत इतिहासाच्या, व...