Tuesday, October 12, 2021

खुले परवाना पत्र

खुले परवाना पत्र
------------------------
मा. सर्व संपादक
दिवाळी अंक 2021
सप्रेम नमस्कार विनंती विशेष
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी
हे खुले परवाना पत्र
देण्यास कारण की,
आपण सर्व जण दिवाळी अंक 2021च्या कामात आहात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण आपला वसा आणि वारसा चालूच ठेवलेला आहे.
यासाठी आपले
अभिनंदन
!!
त्यानुसार दरवर्षी प्रमाणे
मी आज आपण सर्वांना अर्थात ज्यांना वात्रटिका छापायच्या आहेत त्यांच्यासाठी नम्र खुलासा असा की, आपल्याला आवड़तील त्या अणि आवड़तील तेवढया वात्रटिका आपण विना मानधन छापू शकता.
मात्र काही माफक अटी-
1) पानपुरक म्हणून वात्रटिका
अजिबातच छापू नयेत.
2)स्वतंत्र जागा आणि वेटेज द्यावे.
3) वात्रटिका त अजिबात बदल करू नयेत.
4)आहे त्या डिझाइनसह छापल्या गेल्या तर उत्तमच
5)ह्या वात्रटिका मागणीसाठी कृपया मला फोन करू नयेत.
6) ह्या वात्रटिका whatsapp,facebook,twiter,hike,ebooks,epaper,दैनिक झुंजार नेता,दैनिक पुण्यनगरी,दैनिक वात्रटिका, साप्ताहिक सूर्यकांती
आणि
ब्लॉग्ज व इतर मार्गांनी जिथून उपलब्ध होतील तिथून घ्या,मात्र तसा साभार म्हणून उल्लेख करा.
7) माझ्या वात्रटिकांचा खजिना हवा असेल तर क्लिक करा
😎 तसेच मला 9923847269 या व्हाट्सअप क्रमांकावर दिवाळी अंक 2021 साठी वात्रटिका असा मॅसेज केल्यास त्यांना वात्रटिकांची पीडीएफ दिली जाईल.
9) न्यूज चॅनल केव्हा डिजिटल चॅनल दिवाळी अंकासाठी व्हिडिओ वात्रटिका सुद्धा हव्या असतील तर मिळतील.
माझ्या सूर्यकांती लाईव्ह यूट्यूब चॅनल वरून आपल्याला घेता येतील.
10)आपल्याला शक्य असेल तर दिवाळी अंकाची एक प्रत मला पोस्ट किंवा कुरियर ने पाठवा.
माझा पत्ता-
सूर्यकांत डोळसे
मु.पो.ता.पाटोदा
जि. बीड
पिन-414204
मोबा.9923847269
कळावे,
आपला स्नेहांकित

 

No comments:

daily vatratika...29jane2026