Friday, October 29, 2021

कोरोनाचे दुःख.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका 

-------------------


कोरोनाचे दुःख

कितवी लाट?
कितवे लॉकडावून,
मोजणे हळूहळू बंद झाले.
कोरोनाच्या नशेत,
लोक हळूहळू धुंद झाले.

प्रत्येकच गोष्टील्ला,
लामन एके लामन आहे !
कोरोनाचे दुःख,
कॉमन एके कॉमन आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

मोबाईल-9923847269
---------------------------------------
दैनिक पुण्यनगरी

चिमटा -6144
13मे2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...