Thursday, October 7, 2021

मान अपमान...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

मान अपमान

कधी आरत्या गातात,
कधी किरत्या गातात.
नवरात्र महोत्सवात,
पुळक्याला भरत्या येतात.
 
नव्याप्रमाणे नवरात्रीला,
नऊ दिवस असतात.
तिच्यापुढे लोटांगण,
तिच्यापुढे नवस असतात.

नवरात्र संपली की,
पहिले पाढे असतात.
स्त्री सन्मानाला मग,
आढेवेेढे असतात !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6284
दैनिक पुण्यनगरी
7ऑक्टोबर 2021

 

No comments:

daily vatratika...3april2025