Thursday, October 21, 2021

वरदहस्त....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

वरदहस्त

सत्तेचा वापर कमी अन,
गैरवापरच जास्त होत असतो.
जो असतो सत्तेवर बसलेला,
तोच गैरफायदा घेत असत.

फायदा आणि गैरफायदा,
दोन्हीवरही त्यांचा भर असतो !
हाती दिलेली सत्ता म्हणजे,
भस्मासुराला दिलेला वर असतो!!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6298
दैनिक पुण्यनगरी
21ऑक्टोबर 2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...