Friday, October 8, 2021

स्पॉट रिपोर्ट...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

स्पॉट रिपोर्ट

सरकारी कामांना,
बोगसगिरीचा शाप आहे.
खालपासून वरपर्यंत,
सर्वांचेच हे पाप आहे .

पापाच्या वाट्यांमध्ये,
ज्याचे त्याचे टक्के असतात.
कितीही शोधा कच्चे दुवे,
कागदोपत्री ते पक्के असतात.

बोंबा ठोका,तरीही धोका;
सगळा खेळ कागदी आहे!
लोककल्याण उधारीवर,
तळतळाट मात्र नगदी आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7726
दैनिक झुंजार नेता
8ऑक्टोबर 2021

 

ऐतिहासिक विकृती...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- ऐतिहासिक विकृती एकीकडे खोट्या इतिहासाशी, खऱ्या इतिहासाचे लढणे चालू आहे. दुसरीकडे विकृत इतिहासाच्या, व...