Friday, October 29, 2021

वैचारिक प्रभाव..आजची वात्रटिका

आजची वात्रटिका 

---------------------


वैचारिक प्रभाव

जिकडे पहावे तिकडे,
पॉजिटिव्ह चा गजर आहे.
पॉसिटिव्हच्या गजरात,
कोरोनासुद्धा हजर आहे.

सकारात्मक विचारांचा,
केवढा मोठा प्रभाव आहे !
कोरोनासुद्धा विसरून गेला,
आपला काय स्वभाव आहे ?

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
दैनिक पुण्यनगरी

चिमटा =6147
15मे2021

 

No comments:

daily vatratika...29jane2026