Friday, October 22, 2021

सब गोलमाल है...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

सब गोलमाल है

कुणी भलताच खुश आहे,
कुणी मात्र खपा होतो आहे.
कुणाची चालली चुंबाचुंबी,
कुणी कुणाचा पापा घेतो आहे.

कुणी पचवतोय सन्मान,
कुणाचे अपमानाचे घोट आहेत!
कुणी कुणाला दोष द्यावा?
आपलेच दात,
अन आपलेच ओठ आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------
फेरफटका-7738
दैनिक झुंजार नेता
22ऑक्टोबर 2021

 

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...