Friday, October 29, 2021

कोरोना मदत...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

कोरोना मदत

कुणाच्या मदतीचे कुतूहल,
कुणाच्या मदतीचा डंका आहे.
कुणाच्या मदतीचे कौतुक,
कुणाच्या मदतीची शंका आहे.

डंका होवो, वा शंका येवो,
प्रामाणिकता कामाला येईल !
दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी,
व्हायचे तेव्हा नक्की होईल!!


-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------------
चिमटा-6155
दैनिक पुण्यनगरी
24मे 2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...