Thursday, October 7, 2021

नवरात्रीचे नवल...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

नवरात्रीचे नवल

नवरात्रीचे नऊ दिवस असतात,
आपले ठोकताळे पाठ आहेत.
पण यंदाच्या नवरात्रीला मात्र,
दिवस फक्त आठ आहेत.

दिवस आठ, माळा आठ,
नवरात्रीचा नवा थाट आहे !
रात्री आठ असल्यातरी,
नवरात्रीच मुखपाठ आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7725
दैनिक झुंजार नेता
7ऑक्टोबर 2021

 

No comments:

daily vatratika...3april2025