Tuesday, October 19, 2021

डबल गेम... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

डबल गेम


नंबर दोन चे धंदे,
नेता होण्याची अट आहे.
धंदा आणि राजकारण,
मग दोन्हीही हिट आहे.

धंद्याचे राजकारण होते,
राजकारणाचा धंदा असतो!
दोन्ही आघाड्या सांभाळणारा,
कार्यकर्ताच खंदा असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7735
दैनिक झुंजार नेता
19ऑक्टोबर 2021

 

No comments:

आशा आणि निराशा .प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका..

आजची वात्रटिका -------------------------- आशा आणि निराशा ज्याला ज्याला लागली आशा, त्याच्या पदरी निराशा येऊ शकते. सत्तेच्या राजकारणात, हे तर...