Friday, October 29, 2021

गद्दार गँग...आजची वात्रटिका

आ।ज।ची । वा।त्र।टि।का
-------------------------------

गद्दार गँग

भल्या भल्या विश्लेषकांचे
डोके इथे हँग आहे.
सध्याचे राजकारण म्हणजे
निव्वळ गद्दारांची गँग आहे.

गद्दारी कुणीही केली तरी
गद्दारीस त्यांची मान्यता आहे !
ताटापुरतेच बघण्याची
आज गद्दारांची धन्यता आहे !!

-सूर्यकांत डॊळसे, पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------
दैनिक पुण्यनगरी
चिमटा -6141
9मे 2021

 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...