Friday, October 1, 2021

मुक्काम पोस्ट मराठवाडा.. मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
मुक्काम पोस्ट मराठवाडा

शिवारा शिवारात घुसले पाणी,
सगळे शिवार जलयुक्त झाले.
ज्याला जसे बोलता येईल,
तसे ते ते बोलून मुक्त झाले.
त्याला त्याला तसेच दिसणार,
ज्याची ज्याची जशी दृष्टी आहे!
अतिवृष्टीच्या तडाख्यानंतर,
आरोप-प्रत्यारोपांची अतिवृष्टी आहे !!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6279
दैनिक पुण्यनगरी
1 ऑक्टोबर 2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...