Saturday, October 9, 2021

साध्य आणि साधन.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
साध्य आणि साधन
पक्षापेक्षा हाय कमांडवर,
आपली कमांड पाहिजे.
इतरांपेक्षा जास्त,
आपल्याला डिमांड पाहिजे.
पक्षापेक्षा जास्त,
हायकमांडर निष्ठा पाहिजे.
प्रयत्न साधेसुधे नकोत,
प्रयत्नांची पराकाष्ठा पाहिजे.
एकदा हे साध्य झाले की,
सगळे काही साध्य होते !
आपल्या मागण्या पुरविणे,
हायकमांडला बाध्य होते!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
फेरफटका-7727
दैनिक झुंजार नेता
9ऑक्टोबर 2021

 

No comments:

दुष्काळी पाहुणचार ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- दुष्काळी पाहुणचार दुष्काळ पाहणी दौरा बघून, आमचे मतही ठाम झाले. एकाचा पाहुणचार करताना, दुसरेच हकन...