आजची वात्रटिका
-------------------
नेत्यांचे मित्र प्रेम
राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती,
लोक उगीचच दात खात असतात.
ते पुंडलिका वर दे...चा गजर करीत,
मस्करीत नेत्याची लाथ खात असतात.
कर्जमाफीची टिंगल टवाळी करीत,
मित्राला मस्करी करीत टोकता येते.
आपले उघडे पडलेले ' माणिक ' सुद्धा,
नेत्यांना मित्रांच्या मदतीने झाकता येते.
दोघांच्याही मैत्रीचा जुळलेला,
असा काही जबरदस्त टाका असतो !
त्यांची त्यांना टिंगल टवाळी करू द्या,
कुणी छोटा,कुणी मोठा आका असतो!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8879
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
6एप्रिल2025
No comments:
Post a Comment