आजची वात्रटिका
-------------------
पॉलिटिकल ' पोस्ट ' मार्टम
कुणाची सोशल मीडियावर पोस्ट,
कुणाची मीडियाला बाईट आहे.
आजकाल राजकीय टीका टिप्पणीचे,
वातावरण भलतच टाईट आहे.
उचलली जीभ लावली टाळ्याला,
यासाठी सोशल मीडिया बरा आहे.
गाव जले हनुमान बाहर,
अशीच काहीतरी त्यांची तऱ्हा आहे.
उत्तराला प्रत्युत्तर देताना,
कुणालाच कशाचेही भान नाही !
इज्जत द्यावी; इज्जत घ्यावी,
एवढेही साधे सामान्य ज्ञान नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8887
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
14 एप्रिल2025
No comments:
Post a Comment