आजची वात्रटिका
-------------------
लेखन वाचन संहिता
वाचणाराला विचार बोचत नाहीत,
लिहिणाराच्या नजरा बोचल्या जातात.
आजकाल लिहिलेला विचार नाही,
लिहिणाराचे जाती धर्म वाचल्या जातात.
कधी कधी वाचकांचेही बरोबर वाटते,
कारण सगळीच देवघेव आहे.
लिहिणारांनाही जाती-धर्म दाखवायचा,
आज-काल जरा जास्तच चेव आहे.
माणसं नक्की वाचायला शिका,
माणसांचे जाती धर्म मात्र वाचू नका !
सर्वत्र फुले उधळलेली असताना,
जाणीवपूर्वक काटे मात्र वेचू नका !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8895
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
22 एप्रिल2025

No comments:
Post a Comment