आजची वात्रटिका
-------------------
ऑफिशियल फाईलनामा
आत लावलेले कागदी घोडे,
वर बांधलेला टॅग असतात.
ऑफिशियल फायलींचे प्रवास,
समजून घेणे भाग असतात.
कुठे लेट मार्क, कुठे रेट मार्क,
कुठे मारलेल्या पिना असतात.
नस्ती उठाठेव करण्यासाठी,
फायलीवर खानाखुणा असतात.
कुठे चहापाणी,कुठे चिरीमिरी,
कुठे कुठे मात्र खोके असतात!
फायलींच्या रखडतो प्रवास,
टेबला-टेबलावर टोलनाके असतात !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8881
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
8एप्रिल2025
No comments:
Post a Comment