आजची वात्रटिका
-------------------
राजकीय इतिहासकार
ज्याला ज्याला घेता येईल ते,
वर्तमानाचा फायदा घ्यायला लागले.
नवे राजकीय इतिहासकार,
एकाएकी जन्माला यायला लागले.
इतिहासाचा फायदा आणि गैरफायदा,
राजकीय इतिहासकार घेत आहेत.
अगदी अवकाळी वाटावेत असे,
राजकीय इतिहासकारांचे वेत आहेत.
आपला राजकीय फायदा बघणे,
हेच त्यांच्या इतिहासाचे साधन आहे !
आरोप आणि प्रत्यारोपाला मात्र,
रोजच आधणावर आधण आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8892
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
19 एप्रिल2025

No comments:
Post a Comment